Mahashivratri upvas recipe : कोणताही उपवास असला कि अनेकांच्या घरी साधारण एक ठरलेला मेन्यू बनवला जातो. त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी, वरी तांदूळ, फळे, असे पदार्थ असतात. अगदी काहीतरी वेगळं बनवायचे झाले तरीही वडे, थालीपीठ यापलीकडे फार काही केले जात नाही. पण आता महाशिवरात्री जवळ आली आहे. या दिवशी अनेकांचे संपूर्ण दिवस उपवास असतात.

तुमचाही या दिवशी उपवास असेल तर, रताळ्याच्या या गोड फोडी नक्कीच बनवू शकता. हा साधा सोपा पदार्थ नेमका कसा बनवायचा त्यांची रेसिपी युट्युब वरील vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलने शेअर केली आहे; ती पाहू.

Nisargalipi Garden in water
निसर्गलिपी : पाण्यातील बाग
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
Loksatta chaturang article about Kitchen transformation
स्वयंपाकघर ते किचन गोष्ट एका प्रवासाची
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
The lion came with the speed of the wind and attacked the cheetah
जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Vatli Dal Recipe
लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी

हेही वाचा : Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीसाठी ‘थंडाई’ कशी बनवायची? पाहा रेसिपी अन् प्रमाण

उपवासासाठी रताळ्याच्या गोड फोडी कशा बनवायच्या पाहा

साहित्य
१/२ किलो रताळी
१ वाटी ओला नारळ
तूप
१०-१२ लवंग
जिरे
मीठ
साखर
वेलची पूड

हेही वाचा : संकष्टी चतुर्थी विशेष साबुदाण्याची खीर; उपवासाच्या दिवशी बनवा ही खास गोड रेसिपी…

कृती

  • सर्वप्रथम अर्धा किलो रताळी पाण्याने स्वच्छ धुऊन आणि सोलाण्याने सोलून घ्यावी.
  • सर्व रताळी सोलून झाल्यावर, त्याच्या पातळ फोडी चिरून घ्या.
  • आता, गॅसवर एक कढई तापवत ठेवून त्यामध्ये ४ चमचे तूप घालून घ्यावे.
  • तूप थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये १० ते १२ लवंगा घालून त्यांना परतून घ्या.
  • तुपामध्ये लवंगा फुलल्यानंतर, त्यामध्ये चमचाभर जिरं घालून लवंगीसह परतून घ्यावे.
  • आता चिरलेल्या रताळ्याच्या फोडी या कढईमध्ये घालून ढवळून घ्या.
  • रताळ्याच्या फोडी ढवळून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या.
  • आता काही मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून, रताळी शिजू द्यावी.
  • दोन-तीन मिनिटांनी कढाईवरील झाकण काढून, रताळ्याच्या फोडी ढवळून घ्या. रताळी व्यवस्थित शिजण्यासाठी ही कृती साधारण ३ ते ४ वेळा करावी.
  • आता कढईमधील फोडी शिजल्यानंतर, त्यामध्ये एक वाटी ओले खोबरे, आणि पाच ते सहा चमचे साखर घालून, सर्व गोष्टी नीट ढवळून घ्यावे.
  • घातलेली साखर विरघळेपर्यंत, कढईवर पुन्हा झाकण ठेवून द्यावे.
  • रताळ्याच्या फोडी नीट शिजल्यानंतर, त्यांना सोनेरी रंग प्राप्त झाल्यानंतर, त्यामध्ये थोडी वेलची पूड घालून कढईखालील गॅस बंद करावा.
  • तयार आहेत आपल्या उपवास स्पेशल रतळाच्या गोड फोडी. हा पदार्थ गरमागरम असताना खाण्यासाठी घ्यावा.

ही थोडी वेगळी आणि सोपी अशी रेसिपी युट्युब वरील @vmiskhadyayatra103 या चॅनलने शेअर केलेली आहे.