Bhogichi Bhaji Recipe: आज भोगी आहे. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते. याच दिवशी भोगीची खास भाजी केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते. हे तुम्हाला माहितीच असेल. आज आम्ही तुम्हाला सोपी रेसिपी सांगून तुम्हाला घरी झटपट भोगीची भाजी कशी बनवता येईल, यासाठी मदत करणार आहोत. रेसिपी जाणून घेण्यापूर्वी भाजीचे साहित्य एकदा वाचा. तुम्हाला टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली ही भाजी तुम्हालाही बनवायची असेल तर ही रेसिपी जाणून घ्या…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भोगीची भाजी साहित्य :
- वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी
- हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी
- चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा – एक
- तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी
- चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे
- मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा
- तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे
- गरम मसाला पावडर – एक चमचा
भोगीची भाजी कृती :
- वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या.
- तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.
- भोगीच्या दिवशी ही भाजी करतात. बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.
भोगीची भाजी खाण्याचे फायदे - भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर, वांगे, घेवडा, तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात.
- शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.
हेही वाचा >> चविष्ट अन् पौष्टिक, निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
- वांगं हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते.
First published on: 13-01-2025 at 14:30 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know srk