Makar Sankranti special Til ladoo recipe: संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील थंडी आणि त्यात तीळातून उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात.

साहित्य

3/4 किलो पॉलिश न केलेले तीळ

3/4 किलो चिकीचा गूळ

1 वाटी सुकं खोबरं किसून

1 वाटी शेंगदाणे

2 चमचे वेलची पावडर

2 चमचे साजूक तूप

हेही वाचा… दुधी भोपळ्याची रिंग भजी; हिवाळ्यात पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करा

कृती

प्रथम तीळ मंद आचेवर वीस मिनिट हलके होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावेत. नंतर किसलेलं सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजून घ्यावे. त्याचप्रमाणे शेंगदाणे भाजून सोलून अर्धे-अर्धे करून घ्यावे.

एका मोठ्या भांड्यात दोन चमचे साजूक तूप घालून बारीक करून घेतलेला घालावा तो सतत ढवळत राहावा त्याचा हळूहळू गुळ वितळून पाक तयार होतो. मंद आचेवर किमान सात मिनिटं झाली की तो फसफसून येतो, की मग त्याच्यात वरील सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यावे नंतर गॅस बंद करून वेलची पावडर घालून गरम असतानाच लाडू वळून घ्यावेत.

हेही वाचा… Healthy Besan Toast: लहान मुलांना हेल्दी नाश्ता द्यायचाय? मग लगेच बनवा ही ‘बेसन टोस्ट’ रेसिपी

लाडू थंड झाल्यावर स्वच्छ आणि सुक्या डब्यात भरून ठेवावेत. आणि संक्रांतीच्या दिवशी सर्वांना ‘ तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असे बोलून सगळ्यांची तोंडं गोड करावीत.

*ही रेसिपी cookpad वरून घेण्यात आली आहे.

Story img Loader