संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. तीळामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच तीळ हे प्रोटीन आणि ओमेगा ३ चा स्त्रोत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर असते. मकर संक्रांत हा महाराष्ट्र, गुजरात आणि देशाच्या बऱ्याच भागात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. संक्रांत आली की आपण तिळा पासून वेगवेगळे पदार्थ करतो आज आपण पाहुयात खुसखुशीत तीळ गुळाची रेवडी कशी करतात.
खुसखुशीत तीळ गुळाची रेवडी साहित्य
- १ कप तिळ
- १ कप गूळ
- १ टीस्पून वेलचीपूड
- १ टीस्पून पाणी
- १ टीस्पून तुप
खुसखुशीत तीळ गुळाची रेवडी कृती
स्टेप १
तिळ मंद गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यावे व थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्यावी
स्टेप २
गुळ बारीक चिरून घ्यावा..
स्टेप ३
कढईत गुळ व एक टीस्पून पाणी घालून मंद आचेवर पाक बनवायला ठेवावे..सतत ढवळत राहावे
स्टेप ४
गुळ वितळला की हळूहळू बुडबुडे येण्यास सुरुवात होते.. एका वाटीत पाणी घेऊन त्यात दोन थेंब गुळाचा पाक टाकून पाक तयार आहे का ते बघावे.. गुळाच्या पाकाची गोळी होऊन ती हाताने तुटली पाहिजे…ताणली गेली तर पाक तयार नाही असे समजावे…व थोडं शिजू द्यावे..
स्टेप ५
पाकाची गोळी हाताने तुटत असेल तर आपला पाक तयार झाला आहे असे समजावे..व त्यात वेलचीपूड व तिळाची भरड टाकून चांगले मिक्स करून घ्यावे..
स्टेप ६
एका ताटाला तूप लावून घ्यावे व त्यावर हे मिश्रण ओतावे.व थोडे भाजलेले तिळ बाजुला घेऊन ठेवावे.
हेही वाचा >> Halwa Recipe: मकर संक्रांतीला बनवा टेस्टी गुळाचा हलवा; झटपट कसा बनवायचा?
स्टेप ७
गरमागरम असतानाच पटापट मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन तळहातावर गोल वळून नंतर थोडेसे दोन्ही हातांच्या तळहातावर धरुन चपटा आकार द्यावा..व तिळामध्ये घोळवून एका ताटात ठेवावे..
क्रिस्पी कुरकुरीत रेवडी तय्यार..येता जाता खाण्यासाठी सज्ज व्हा..