Makar Sankranti Special Khichdi Video : मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ गुळाचे लाडू, तिळगुळाची पोळी, खिचडी तयार केली जाते. खिचडी खाण्याची परंपरा आहे. या खिचडीला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असले तरी ही खिचडी आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मकर संक्रांती स्पेशल खिचडी कशी तयार केली जाते? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. ही खिचडी तयार करण्यास अत्यंत सोपी आहे. उडीद डाळ आणि तांदळाचा वापर करून तुम्ही अगदी २० मिनिटांमध्ये ही खिचडी तयार करू शकता. (Makar Sankranti Special Khichdi How to make khichdi check easy recipe)
मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी (Makar Sankranti Special Khichdi )
साहित्य
उडीद डाळ
तांदुळ
जिरे
हिंग
लाल मिरची
लवंग
दालचिणी
काळीमिरी
वेलची
तेजपत्ता
बटाटे
हिरवी मिरची
आले
हिरवे मटार
मीठ
हळद
पाणी
तूप
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
कृती
२ ते ३ कप उडीद डाळ घ्या.
दीड कप तांदुळ घ्या
उडीद डाळ आणि तांदुळ स्वच्छ नीट धुवून घ्या.
त्यानंतर उडीद डाळ आणि तांदुळ एकत्र करून स्वच्छ पाण्यात दहा मिनिटे भिजवून ठेवा.
त्यानंतर गॅसवर कुकुर ठेवा.
त्यात तूप टाका. तूप गरम झाले की त्यात जिरे, हिंग, लाल मिरची, लवंग, दालचिणी, काळीमिरी, वेलची आणि तेजपत्ता टाका.
सर्व मसाले नीट परतून घ्या.
त्यानंतर कापलेले बटाटे टाका. ते चांगले परतून घ्या.
त्यानंतर बारीक केलेले आलं आणि हिरवी मिरची त्यात टाका.
त्यानंतर त्यात हिरवे मटार टाका.
थोडी हळद टाका आणि चवीनुसार मीठ टाका.
त्यानंतर त्यात पाण्यात भिजवलेले उडीद डाळ आणि तांदुळ टाका.
सर्व मिश्रण एकत्र करा.
त्यानंतर प्रमाणानुसार पाणी टाका.
सर्व मिश्रण एकत्र करा
त्यानंतर कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या होऊ द्या.
त्यानंतर गॅस बंद करा.
गरमा गरम उडीद डाळीची खिचडी तयार होईल.