मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू झाली असून, तिळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की बनवण्यास सुरुवात देखील झाली आहे. या निमित्तानं तिळ आणि गुळाचा वापर करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिला प्रयत्न करतात. त्यापैकी एक म्हणजे तीळ गुळाची पोळी. अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पोळी.

तिळाची पोळी साहित्य

अर्धा वाटी तीळ
एक वाटी भाजलेले शेंगदाणे
एक वाटी गूळ
एक वाटी मैदा
एक वाटी सुक किसलेलं खोबरं
जायफळ आणि वेलची पावडर

तिळाची पोळी कृती

सर्वप्रथम तीळ, शेंगदाणे, गुळ, किसलेलं खोबरं, जायफळ आणि वेलची पावडर मी सगळे जिन्नस एकत्र करून घ्या. एकत्र करून हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

मैद्याचे पीठ मळून घेऊन मऊ लुसलुशीत करा. मैद्याचे पीठ अर्धा तास झाकून पोळी लाटायला घेऊ शकता.

सर्वप्रथम मैद्याचा गोळा घेऊन थोडी लाटून घ्या त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून काढलेले जिन्नस दोन चमचे घाला आणि पुन्हा गोळा बनवून पोळी लाटा.

जितकी मोठी पोळी लाटता येईल तितकी मोठी पोळी लाटण्याचा प्रयत्न करा. पोळी व्यवस्थित गोल लाटल्यानंतर एका तव्यामध्ये खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या.

हेही वाचा >> मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा शेव पराठा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

तुम्हाला हव असेल तर पोळीला तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने आपली तिळाची पोळी तयार आहे. मी तिळाची पोळी तुम्ही चहा सोबत किंवा असंच सुद्धा खाऊ शकता.