सायंकाळी आपल्यापैकी अनेकांना छोटी भूक लागते अशा वेळी काहीतरी खाण्याची इच्छा होते. अनेक लोक सांयकाळी चहाच्यावेळी हलका फुलका नाश्ता करतात. कोणी भेळ खाते तर कोणी चहा बिक्सिट खाते. नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळाला असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. खाकरा चाट ही चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. घरच्या घरी सहज तयार करता येणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा हलक्या भूकेसाठी एक उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा खाकरा चाट कसा तयार करायचा जाणून घेऊ या…

हेही वाचा –Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

साहित्य:

खाखरा

  • चिरलेला कोबी
  • बारीक चिरलेले टोमॅटो
  • चिरलेली शिमला मिरची
  • मसाला शेंगदाणे
  • चिरलेली कोथिंबीर
  • बारीक शेव
  • चाट मसाला
  • किसलेले चीज
  • चिली फ्लेक्स
  • हिरवी चटणी
  • टोमॅटो सॉस

हेही वाचा –रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट

कृती:

  • १. प्रथम एका ताटात खाकरा ठेवा आणि त्यावर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस एकसारखा पसरवा.
  • २. त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, कोबी आणि शिमला मिरची व्यवस्थित पसरवा.
  • ३. चवीनुसार चाट मसाला आणि तिखट फ्लेक्स शिंपडा.
  • ४. खुसखुशीतपणा वाढवण्यासाठी वरून मसाला शेंगदाणे आणि बारीक शेव भुरभुरा.
  • ५. शेवटी किसलेले चीज आणि कोथिंबीर टाकून डिश सजवा.
  • ६, खाखरा चाट तयार आहे; ताबडतोब सर्व्ह करा.

हेही वाचा – मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी

ही रेसिपी फक्त पाच ते दहा मिनिटांत तयार होते आणि यामध्ये तुम्ही हवे असल्यास इतर साहित्यही घालू शकता, जसे की कांदा, दही किंवा फरसाण. खाकऱ्याचा कुरकुरीतपणा, आणि मसालेदार भाज्यांची चव हा चाट अधिक स्वादिष्ट बनवतो.

ही रेसिपी मुलांच्या डब्यात किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी परफेक्ट आहे. नक्की करून बघा आणि चविष्ट खाखरा चाटचा आस्वाद घ्या!