Shevpuri Sandwich Recipe: व्हेजिटेबल सँडविच, टोस्ट सँडविच, चिकन सँडविच आतापर्यंत तुम्ही अनेकदा ट्राय केले असेल. पण आज आम्ही तुम्हाला शेवपुरी सँडविच कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग पटकन नोट करा साहित्य आणि कृती…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
शेवपुरी सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ४ उकलेले बटाटे
- २ टोमॅटो बारीक केलेले
- १ चमचा चाट मसाला
- २ कांदे बारीक चिरलेले
- १० ब्रेड स्लाइस
- १ वाटी पूदिना चटणी
- १ वाटी आंबटगोड चटणी
- २ चमचे बटर
- कोथिंबीर
- १ कप शेव
- १२-१३ चपटी पुरी
- चवीनुसार मीठ
शेवपुरी सँडविच बनवण्याची कृती:
हेही वाचा: शिळ्या पोळीपासून झटपट बनवा मसाला पोळी; नोट करा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी बटाटे उकडून बारीक करून घ्या त्यात कोथिंबीर, मीठ, चाट मसाला घालून सर्व एकत्र करून घ्या.
- ब्रेडवर आधी बटर नंतर पुदीना चटणी लावून घ्या. आता त्यावर चपटी पुरी ठेऊन त्यावर बटाट्याचे मिश्रण घाला.
- त्यानंतर त्यावर कांदा, टोमॅटो, पुदीना चटणी, आंबटगोड चटणी, शेव घालून बटर लावलेले ब्रेड स्लाइस ठेवा.
- टोस्ट सँडविचचे भांडे घेऊन सँडविच दोन्ही बाजूंनी व्यवस्थितीत भाजून घ्या.
- तयार गरमागरम टोस्ट सँडविच सॉससह सर्व्ह करा.
First published on: 29-08-2024 at 19:24 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make a quick chatpata shevpuri sandwich write down materials and recipe sap