Leftover Rice Bhaji: कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भजी तुम्ही नेहमीच आवडीने खात असाल; पण तुम्ही कधी भातापासून बनवलेली भजी खाल्ली आहे का? अनेकदा रात्री उरलेले अन्न काही जण टाकून देतात. रात्री उरलेल्या भातापासून फोडणीचा भात, ढोकळा, इडली यांसारखे तुम्ही बनवतच असाल. पण, आज आम्ही तुम्हाला भाताची भजी कशी बनवायची ते सांगणार आहोत.
भातापासून भजी बनविण्यासाठी साहित्य:
१. उरलेला भात
२. २ वाटी बेसनाचे पीठ
३. ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
४. १ कप गव्हाचे पीठ
५. १ चमचा लाल तिखट
६. १ चमचा जिरे
७. १/२ चमचा हळद
८. चवीप्रमाणे मीठ
९. तळण्यासाठी तेल
१०. कोथिंबीर
भातापासून भजी बनविण्यासाठी कृती:
हेही वाचा: फिश कटलेटचे नुसते नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना? मग लगेच नोट करा बघू साहित्य आणि कृती
१. सर्वांत आधी एका भांड्यामध्ये उरलेला भात घ्या. त्यामध्ये बेसन पीठ, गव्हाचे पीठ, लाल तिखट, जिरे, हळद, कोथिंबीर, चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मिसळा.
२. त्यात लागेल तसे पाणी घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
३. भाताला व्यवस्थित मिसळून भज्याचे पीठ तयार करा.
४. आता एका कढईत तेल गरम करून, त्यात भजी तळण्यासाठी सोडा.
५. भजी मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या.
६. तयार गरमागरम भाताच्या भजी सॉससोबत सर्व्ह करा.