Wheat Flour sheera: आतापर्यंत तुम्ही रव्याचा शिरा, ओट्स शिरा, रताळ्याचा शिरा अशा विविध पद्धतींचा शिरा बनवला असेल. पण, आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
गव्हाच्या पिठाचा शिरा बनण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप गव्हाचे पीठ
- २ कप साखर
- १ वाटी मिक्स ड्रायफ्रुट्स
- १ चमचा वेलची पूड
- १/२ वाटी सुकं खोबर
- १/४ वाटी खजूर
- २ चमचे चारोळ्या
- तूप आवश्यकतेनुसार
- पाणी आवश्यकतेनुसार
गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्याची कृती:
हेही वाचा: मुलांच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी झटपट बनवा तांदळाचे वडे; लिहून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वात आधी गरम कढईत तूप घालून त्यात गव्हाचे पीठ मंद आचेवर परतवून घ्या.
- पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये साखर घालून या मिश्रणात वेलची आणि खोबऱ्याचा किस घाला.
- त्यानंतर त्यात सर्व ड्रायफ्रुट्स घालून सर्व मिश्रण परता.
- नंतर या सर्व मिश्रणात दोन कप पाणी घाला.
- पाणी थोडे आटल्यानंतर गॅस बंद करा.
- तयार गरमागरम गव्हाचा शिरा सर्व्ह करा.