Banana Raita Recipe: श्रावणात उपवासात काय खावं असा प्रश्न पडतो. अशावेळी सतत साबुदाणा खिचडी, फळं खाऊनही खूप कंटाळा येतो. जर तुम्हालाही उपवासात काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला केळ्याचे रायते कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केळ्याचे रायते बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ५-६ पिकलेली केळी
  • १ कप सुके बारीक खोबरे
  • ७-८ बारीक कापलेले बदाम
  • १ लिंबाचा रस
  • २ कप दही

केळ्याचे रायते बनववण्याची कृती:

हेही वाचा: डब्याला पोळी-भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग बनवा गव्हाच्या पिठाचा शिरा; नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वात आधी सुके बारीक केलेले खोबरे तांबुस होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर केळ्यांचे काप करून त्या कापांना लिंबाचा रस लावा जेणेकरुन केळी काळी पडणार नाहीत.
  • आता त्या कापांमध्ये दही, भाजलेले खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा.
  • तयार उपवासाचा चविष्ट रायता गार करुन खायला घ्या.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make banana raita on shravani monday note the ingredients and recipe sap