Besan Appe Recipe: आजपर्यंत तुम्ही मिक्स डाळीचे आप्पे, मूगाचे आप्पे नक्की खाल्ले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला बेसनाचे आप्पे कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी
बेसनाचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ वाटी
- १/२ वाटी बारीक चिरलेला कोबी
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ बारीक चिरलेली शिमला मिरची
- १/२ वाटी दही
- १/२ वाटी कोथिंबीर
- ५-६ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १ चमचा ओवा
- १/२ चमचा हिंग
- १/२ चमचा हळद
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
- १/४ लहान चमचा सोडा
बेसन आप्पे बनवण्याची कृती:
- सर्वप्रथम एका ताटामध्ये तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करा त्यात थोडंसं पाणी घाला.
- चिमूटभर सोडा या मिश्रणात टाका.
- आप्पेच्या साच्याला तेलाने ब्रश लावून प्रत्येक साच्यात एक पीठ घाला.
- त्यानंतर मंद ते उच्च आचेवर ७-८ मिनिटे शिजवा.
- तयार आप्पे साच्यातून काढा आणि सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.