Coconut Modak: आज सगळीकडे अंगारक संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी बाप्पाचे अनेक भक्त उपवास करतात, तसेच संध्याकाळी बाप्पाच्या नैवेद्यासाठी आवर्जून उकडीचे मोदक बनवतात. उकडीचे मोदक बनवण्यासाठी वेळ लागतो. अशावेळी तुम्ही झटपट होणारे नारळाचे मोदकदेखील आवर्जून बनवू शकता.

नारळाचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. २ ओल्या नारळाचा किस
२. १/२ डबा कंडेंस्ड दूध
३. १ कप किसलेला गूळ
४. २ चमचा तूप
५. १ वाटी बारीक केलेले काजू, बदाम

नारळाचे मोदक बनवण्यासाठी कृती:

हेही वाचा: घरच्या घरी या सोप्या पद्धतीने बनवा पेरुचा हलवा; लिहून घ्या साहित्य आणि कृती

१. सर्वप्रथम एका गरम कढईत किसलेला नारळ आणि कसलेला गूळ घालून हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

२. गूळ वितळल्यानंतर त्यात पाऊण डबा कंडेंस्ड दूध टाका आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या.

३. आता त्यावर बारीक केलेले काजू, बदाम टाका.

४. आता मोदकाच्या साच्याला तूप लावून साच्यामध्ये तयार मिश्रण भरून मोदक तयार करून घ्या.

५. काही वेळ नारळाचे मोदक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

६. तयार मोदकांचा नैवेद्य दाखवून त्याचा आस्वाद घ्या.