Corn-Rawa Balls recipe: महिलांना दररोज नाश्त्याला काय बनवायचं? असा प्रश्न नेहमीच पडतो. दररोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कॉर्न-रवा बॉल्स कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॉर्न-रवा बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३ कप रवा
  • ३ ग्लास पाणी
  • मीठ चवीनुसार
  • २ चमचा चिली फ्लेक्स
  • दीड चमचे लाल मिरची पावडर
  • १ चमचा हळद
  • १ कप उकडलेला मका
  • १/२ चमचा मोहरी
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा आल्याची पेस्ट

कॉर्न-रवा बॉल्स बनवण्याची कृती:

हेही वाचा: चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…

  • सर्वप्रथम एका भांड्यात रवा मंद आचेवर भाजून घ्या आणि भाजल्यानंतर गॅस बंद करा.
  • नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी नंतर मका, आलं, चिली फ्लेक्स, हळद, मीठ, रवा आणि पाणी घालून मिश्रण सतत हलवून शिजवून घ्या.
  • आता हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि रव्याचे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
  • आता त्याचे छोटे-छोटे गोळे करून ते गरम तेलात तळून घ्या.
  • गरमागरम कॉर्न- रवा बॉल्स सॉसबरोबर सर्व्ह करा.