Creamy Corn Chaat: पावसाळ्यात नेहमी आपल्या काहीतरी चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण कांदा भजी, चहा, वडापाव अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेतो. आज आम्ही तुम्हाला क्रीमी कॉर्न चाट कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…
क्रीमी कॉर्न चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. २ कप उकडलेले कॉर्न (मका)
२. २ टोमॅटो बारीक चिरलेले
३. १ लिंबाचे तुकडे
४. १ चमचा लाल तिखट
५. १ वाटी बारीक शेव
६. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
७. १/२ वाटी लाल शिमला मिरची चिरलेली
८. १/२ चमचा चिली फ्लेक्स
९. १ चमचा बटर
१०. २ चमचे लसूण चिरलेला
११. मीठ चवीनुसार
क्रीमी कॉर्न चाट बनवण्याची कृती:
हेही वाचा: फक्त १५ मिनिटांत बनवा वाटाणा-पोह्याचे टेस्टी कटलेट; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यात लाल शिमला मिरची घाला.
२. लाल शिमला मिरची मध्यम आचेवर ५ मिनिट परता आणि त्यात कॉर्न घालून आणखी एक मिनिट परतून घ्या.
३. त्यानंतर त्यात लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.
४. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, शेव, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा.
५. आता यावर मेयोनीज घाला आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करा आणि सर्व्ह करा.