नाश्ता आपल्या रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रोज ऑफिसला किंवा शाळा-कॉलेजमध्ये जाण्याच्या धावपळीमध्ये डब्याला काय नाश्ता द्यावा असा प्रश्न अनेकदा गृहिंनीना पडतो. रोज शिरा-पोहे- उपीट खाऊन कंटाळल्यानंतर नवीन काय बनवावे समजत नाही. डोसा-इडलीसाठी खूप व्याप असतात, आदल्या रात्री तांदुळ भिजवावे लागतात आणि पीठ मिक्सरमधून वाटावे लागते. आधी खूप तयार करावी लागते. हे खरे असले तरी एवढे व्याप न करता झटपट डोसा तयार करता येऊ शकतो. होय तुम्ही रवा आणि मुरमुरे वापरून झटपट नाश्ता तयार करू शकता. स्वस्तात मस्त कधी खाल्ला नसेल असा नाश्ता कसा बनवायचा जाणून घ्या…

मुरमुरे आणि रव्याचा झटपट डोसा

साहित्य

मुरमुरे – २ कप
रवा – १/२ कप
दही – १/४ कप
पाणी – १ + १/२ कप
गाजर – १
शिमला मिरची-१
कांदा – १
टोमॅटो – १
कोथिंबीर – एक वाटी
सांबार मसाला -१ चमचा
बेकिंग सोडा – १/२ चमचा
मीठ – चवीनुसार
स्वयंपाक तेल – आवश्यकतेनुसार

हेही वाचा – हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या

हेही वाचा – नवीन वर्षाच्या आधी बटाट्याचा ‘हा’ पदार्थ नक्कीच करून पाहा, चव कायम राहील लक्षात!

कृती

एका मिक्सरच्या भांड्यात २ कप मुरमुरे, अर्धा कप रवा, दही आणि पाणी टाका आणि मिक्सरच्या भांड्यात काहीवेळ फिरवून चांगले बारीक मिश्रण तयार करा.

डोसाच्या पीठा सारखे पीठ तयार करून घ्या. पीठावर झाकण ठेवून काही वेळ बाजूला ठेवा.

आता तयार पिठामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर, मीठ टाका आणि मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.

आता तवा गॅसवर तापवून घ्या आणि त्यावर थोडे तेल टाका. आता तयार पिठाचा डोसा बनवा. डोस्याला जाळी येऊ लागली त्यावर थोडासा सांबर मसाला शिंपडा. काही वेळाने डोसा तव्यावरून काढा. गरमा गरम डोसा चटणीबरोबर खा.

Story img Loader