तुम्हाला चटणी खायला आवडते का? मग तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चटणी हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. चटणीशिवाय जेवण पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही खोबऱ्याची, शेंगदाण्याची चटणी नेहमीच खात असाल पण तुम्ही कधी टोमॅटोची चटणी खाऊन पाहिली आहे का? तुम्ही लाल टोमॅटोची लाल चटणी अनेकदा खाल्ली असेल पण टोमॅटोची हिरवी चटणी कधी खाल्ली आहे का? नसेल तरीही आता नक्की खाऊन पाहा. सोपी आणि स्वादिष्ट चटणीची रेसिपी जाणून घेऊ या..
अनेकदा लग्नामध्ये किंवा संभारभाच्या मेजवानीमध्ये टोमॅटोची हिरवी चटणी आवर्जून बनवली जाते. त्याची चव अप्रतिम असते पण ही चव घरी चटणी तयार केल्यावर मात्र येत नाही. पण आचाऱ्यांसारखी हिरवी टोमॅटो चटणी घरच्या घरी कशी तयार करायची हे जाणून घेऊ या..
टोमॅटोच्या हिरव्या चटणीसाठी साहित्य
- हिरवे टोमॅटो – २-४
- लसूण – एक लसूण
- मिरची – ४-
- कोथिंबीर – एक वाटी
- भुईमुगांचे कच्चे शेंगदाणे – एक वाटी
- मीठ – चवीनुसार
फोडणीसाठी
तेल, जिरे, मोहरी, कडीपत्ता
हेही वाचा
कृती
- प्रथम एका तव्यात मिरच्या, लसूण आणि भुईमुग सोलले कच्चे शेंगदाणे टाका आणि चांगले भाजून घ्याय
- आता टोमॅटोचे काप करून घ्या आणि कढईत चांगले भाजून घ्या.
- मिक्सरमध्ये टोमॅटो, मिरची, लसून आणि दाणे टाका. त्यात जिरे, हळद, मीठ टाकून चटणी वाटून घ्या.
- फोडणीसाठी तेल गरम करा त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता टाका आणि तयार चटणीमध्ये टाका.
- भुईमुग सोलले कच्चे शेंगदाणे टाका हा सिक्रेट पदार्थ आहे जो या चटणीची चव वाढवतो.
- गरमा गरम भाकरी-चपाती किंवा भातासह ही चटणी खाऊ शकता.
मुलांच्या डब्याला देखील तुम्ही हे ट्राय करू शकता.