थंडीच्या दिवसांमध्ये येणाऱ्या हिरव्यागार मटारांचा वापर आपण पुलाव, उसळ, भाजी असे पदार्थ बनवण्यासाठी करत असतो. त्यासोबतच कधी काही चटपटीत असे खावेसे वाटत असेल; तर फार-फार हराभरा कबाब बनवून त्यामध्येही मटार वापरले जातात. मात्र आपला आहार/डाएट न सोडता जर पौष्टिक आणि प्रथिनयुक्त काही खायचे असेल तर काय बरं खावे? असा प्रश्न अनेकांना, खासकरून व्यायाम आणि वजन कमी करणाऱ्यांना पडतो.

मात्र, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @nehadeepakshah या अकाउंटने शेअर केलेल्या पौष्टिक चिजी मटार कबाबची रेसिपी तुमची चटपटीत खाण्याची इच्छा तर पूर्ण करेलच मात्र, एका कबाबमधून तुम्हाला ४ ग्रॅम इतक्या भरपूर प्रमाणात प्रथिने मिळण्यासही मदत होईल. त्यामुळे तुमचा आहार सांभाळत, पौष्टिक, चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोप्या अशा मटार कबाबची काय रेसिपी आहे, पाहा

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हेही वाचा : Recipe : ब्रेड न वापरता बनवा पौष्टिक ‘व्हेज सँडविच’; काय आहे रेसिपी अन् प्रमाण पाहा…..

साहित्य

२ लहान चमचे tsp तेल
५-६ लसूण पाकळ्या
१ लहान चमचा tsp किसलेले आलं
२ हिरव्या मिरच्या
१ माध्यम आकाराचा कांदा
१ कप पालक [चिरलेला]
१ बाउल हिरवे मटार
१/२ कप चणा डाळ [भिजवून शिजवलेली]
१/२ लहान चमचा tsp गरम मसाला
१/२ लहान चमचा tsp कसुरी मेथी
मीठ
मिरपूड
तूप
चीज स्लाइस [चार कबाबसाठी १ स्लाइस]

हेही वाचा : Recipe : ‘दही’ वापरून १५ मिनिटांत घरीच बनवा चीज स्प्रेड! काय आहे याची भन्नाट रेसिपी पाहा….

कृती

सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये, थोडे तेल घालून घ्या.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कांदा, पालक, हिरवे मटार, शिजवलेली चणा डाळ आणि थोडा गरम मसाला घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून शिजवून घ्यावे.
आता तयार भाज्यांचे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची एक पेस्ट बनवून घ्या.
पुन्हा कढईमध्ये भाज्यांची तयार केलेली पेस्ट मीठ आणि मिरपूड घालून शिजवून घ्यावी. शेवटी यामध्ये चवीसाठी थोडी कसुरी मेथी घालावी.
नंतर, तयार कबाब मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करताना यात थोडे चीज घालून गोळ्यांना, हातावर हलके चपटे करून त्यांना कबाबचा आकार द्यावा.
एक पॅन किंवा तवा घेऊन, त्यावर थोडेसे तूप पसरवून तयार कबाबचे गोळे सोनेरी होईपर्यंत खरपूस परतून घ्या.
तयार आहेत आपले प्रथिनयुक्त असे पौष्टिक मटार कबाब. हे कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.
तुपामध्ये हे कबाब परतल्यामुळे याची चव वाढण्यास मदत होते.

@nehadeepakshah या अकाउंटने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पौष्टीक कबाब रेसिपीला आतापर्यन्त ६७९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.