दररोजच्या जेवणात डाळ हा घटक न चुकता वापरला जातो. डाळीमध्ये असणारी प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक या सर्वांमुळे तिचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा भरपूर फायदा असतो. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात तूर, मसूर, मूग इत्यादी अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जात असतात. त्या प्रत्येक डाळीची चव, ती बनवण्याची रेसिपी आणि त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या गोष्टी हे सर्व काही वेगवेगळे असते. इतर पदार्थांसोबतच डाळ बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे डाळ बनवण्याची पद्धत.

प्रत्येक व्यक्ती त्याला आवडते तशा पद्धतीने डाळीला फोडणी देते वा तिच्या पद्धतीने डाळ शिजवत असते. काहींना डाळ शिजवण्याआधी भिजवणे पसंत असते; तर काहींना ती नुसती कुकरमधून शिजवताना त्यात मसाले घालायची सवय असते. परंतु, शेवटी अन्न बनवणाऱ्याच्या हाताला चव असली की, कोणत्याही पद्धतीने बनवलेला पदार्थ हा चविष्टच लागतो.

gobi keema recipe
Gobhi Keema Recipe: एका कोबीपासून बनवा ‘ही’ झणझणीत रेसिपी, लिहून घ्या साहित्य आणि कृती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी

हेही वाचा : हिवाळ्यात साखर आणि फॅट्स कमी असणारे हलवा बनवा; शेफने सांगितलेल्या ‘या’ पाच रेसिपी पाहा

पण जे स्वयंपाकघरात नवखे आहेत किंवा ज्यांना पदार्थ बनवण्याची आवड आहे; पण कुणाची तरी मदत लागते; असे जर काही तुमचेही असेल, तर डाळ बनवण्याच्या या सोप्या आणि उपयुक्त टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील.

स्वादिष्ट डाळ बनवण्यासाठी उपयुक्त स्टेप्स

१. डाळ भिजवणे

डाळ शिजवताना सर्वांत महत्त्वाचे असते ते म्हणजे डाळी धुऊन आणि भिजवून घेणे. कोणतीही डाळ असली तरीही ती स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे असते. असे केल्याने त्यामधील अनावश्यक वा अपायकारक घटक निघून जातात. एखाद्या वेळेस त्यात किडे, मुंग्या असतील, तर त्यादेखील निघून जाण्यास मदत होते. मसूर आणि मूग डाळ साधारण १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवू शकता; परंतु चण्यासारखे पदार्थ जास्त वेळ भिजवून ठेवावे लागतात.

२. पाण्याचे प्रमाण

डाळ घट्ट हवी आहे की पातळ हे आधीच ठरवून घेणे महत्त्वाचे असते. कारण- सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर जर पाणी कमी पडले, तर डाळ अतिशय घट्ट होऊ शकते; परंतु पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असेल, तर ती पाणचट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण ठरवून घ्या. साधारण एक कप डाळीसाठी चार कप पाणी हे प्रमाण योग्य ठरू शकते.

हेही वाचा : किलोभर कांदे-बटाटे एकाच टोपलीत? ही चूक तुम्ही करू नका; लक्षात घ्या कारण….

३. कुकरमध्ये डाळ शिजवताना…

बरेच जण डाळ ही एकमार्गी कुकरमध्ये शिजवून मोकळे होतात. असे करताना डाळीसोबत आले, लसूण, कांदा, टोमॅटो असे सर्व पदार्थ एकदम कुकरमध्ये घालून घेतात; परंतु किमान सुरुवातीला तरी असे करू नका. प्रत्येक डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी आपापला वेळ घेत असते. त्यामुळे आधी ती कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकरमधील वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतर मगच झाकण उघडून पुढील गोष्टी कराव्यात.

४. डाळीची फोडणी

डाळ कशी शिजवायची हे आता तुम्हाला माहीत झाले आहे. यानंतरची स्टेप म्हणजे फोडणी देणे. तुम्ही फोडणीमध्ये डाळ घालत आहेत की डाळीला वरून फोडणी देणार आहात यावरूनसुद्धा त्याची चव ठरत असते. त्यासोबतच तुम्ही फोडणीमध्ये कोणते पदार्थ घालत आहात हे लक्षात घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे. काहींना अगदी साध्या चवीची डाळ आवडते. त्यासाठी फोडणीमध्ये केवळ हिंग,जिरे घातले जाते; तर काहींना छान चमचमीत डाळ आवडते, अशा वेळेस त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लाल तिखट किंवा मिरची आणि हळद अशा गोष्टी घातल्या जातात.

यापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारची डाळ खाणे पसंत आहे त्यानुसार फोडणीची निवड करा आणि छान गरम मऊ भातासोबत त्याचा आस्वाद घ्या.

Story img Loader