Mithai Kheer: दिवाळीत नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याकडून किंवा ऑफिसमधून विविध प्रकारची मिठाई भेट म्हणून दिली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांचा घरात ढीग लागतो. त्याशिवाय घरातही फराळ बनवलेला असतो वा बाहेरून तयार फराळ आणलेला असतो. त्यामुळे मिठाई खायला अनेक जण कंटाळा करतात. मग अशा वेळी तुम्ही तुमच्याकडील मिठाई वाया जाऊ न देता, त्यापासून खीर बनवू शकता. असे करण्याने तुमची मिठाईदेखील संपेल आणि तुम्हाला नव्या पदार्थाचा आस्वादही घेता येईल.

खीर बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

  • माव्याची मिठाई
  • सोनपापडी
  • काजू कतली
  • साखर चवीनुसार
  • २ चमचे तूप
  • १ लिटर दूध
  • १ वाटी ड्रायफ्रुट्स (काजू, बदाम, पिस्ता)

खीर बनविण्याची कृती:

हेही वाचा: घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वांत आधी एका कढईत तूप गरम करून, त्यात ड्रायफ्रुट्स टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात दूध टाकून, दुधात सोनपापडी, माव्याची मिठाई, काजू कतली कुस्करून टाका.
  • हे मिश्रण काही मिनिटे ढवळून घ्या आणि नंतर त्यात चवीप्रमाणे साखर टाका.
  • आता पाच ते १० मिनिटे मिठाईपासून बनवलेली खीर मंद आचेवर शिजवून घ्या. नंतर त्यात ड्रायफ्रुट्स टाकून खीर सर्व्ह करा.

Story img Loader