Palak Rice : तुम्हाला भात खायला आवडतो का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भात खाल्ले असतील. साधा भात, मसाले भात, जीरा राईस, फोडणीचा भात, व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी….असे अनेक पर्याय भातामध्ये येतात. तुम्हाला यापेक्षा वेगळ्या पद्धतीचा भात खाऊन पाहायचा असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी आहे ती म्हणजे पालक राईस. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही झटपट भात तयार करू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पालक भात नक्की आवडेल. प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांनी ही रेसिपी इंस्टाग्रामला शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
Palak Rice : पालक भात रेसिपी
पालक भात करण्यासाठी साहित्य
१/२ कप पालक प्युरी
३ कप शिजवलेला भात
११/२ टीस्पून तेल
१ टीस्पून जिरे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
2 चमचे बारीक चिरलेला लसूण
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
2 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
चवीनुसार मीठ
हेही वाचा – केळ आणि कॉफीपासून तयार केलेला केक खाऊन पाहाल तर, चॉकलेट-व्हॅनिला केक खाणे विसराल
पालक भात करण्याची पद्धत
एका रुंद नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कांदे घालून मध्यम आचेवर १ ते २ मिनिटे परतून घ्या. त्यात लसूण घालून मध्यम आचेवर १ ते २ मिनिटे परतावे. त्यानंतर टोमॅटो घालून मध्यम आचेवर आणखी २ मिनिटे परतावे. त्यात हिरवी मिरची पेस्ट, पालक प्युरी घालून चांगले मिसळा आणि सतत चमत्याने हलवत राहा. २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. तांदूळ आणि मीठ घालून चांगले मिसळा आणि मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे शिजवा, अधूनमधून चमच्याने हलवत राहा.
हेही वाचा – चटपटीत मसाला कॉर्न चाट, फक्त ५ मिनिटांत होईल तयार! लिहून घ्या सर्वांच्या आवडत्या पदार्थाची रेसिपी
गरमागरम पालक भात सर्व्ह करा.