Milk Pedha recipe: श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला हे सण साजरे केले जातात. त्यामुळे सणासुदीला घरी काहीतरी गोड पदार्थ बनवला जातो. बऱ्याचदा वेळ नसल्यामुळे मिठाई बाजारातून आणली जाते. बऱ्याचदा ही मिठाई भेसळयुक्त असते. ज्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
दूधाचे पेढे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ लीटर दूध
- ५० ग्रॅम साखर
- ३ चमचे वेलची पावडर
- १ चमचा ताजी साय
- २ चमचे दूध पावडर
- बारीक साखर आवश्यकतेनुसार
दूधाचे पेढे बनवण्याची कृती:
हेही वाचा: श्रावणात आवर्जून बनवा गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वात आधी कढईत दूध उकळायला ठेवा आणि त्यात दूधाची साय, साखर घालून ढवळून घ्या. दुधाला उकळी येऊ द्या.
- दुधाला सतत ढवळत राहा, जेणेकरून दूध खाली लागणार नाही.
- त्यानंतर त्यात दूध पावडर घालावी, ज्यामुळे त्याचा मावा तयार होईल.
- मावा झाल्यावर गॅस बंद करुन तो थंड झाल्यावर त्यात वेलची पावडर घालून थोडे मळून घ्यावे आणि त्याचे पेढे बनवावे.
- तयार पेढ्यांवर तुम्ही पिस्त्याचे काप लावून सजवा आणि नैवेद्य दाखवून त्यांचा आस्वाद घ्या.