Poha Dhokla Recipe: ढोकळा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पण बऱ्याचदा घरात ढोकळा बनवायला गेल्यावर तो फसतो. अशावेळी सोप्या पद्धतीने पोह्यांचा ढोकळा नक्कीच तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती

पोह्यांचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ कप रवा
  • २ कप पोहे
  • २ कप दही
  • २ चमचे बेकिंग सोडा
  • कढीपत्त्याची पाने
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • २ चमचे हिंग
  • १ मोठा चमचा मोहरी
  • १ चमचा हळद
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

पोह्यांचा ढोकळा बनवण्याची कृती:

हेही वाचा: तिखट, झणझणीत खावंसं वाटतंय? झटपट बनवा तांदळाचे चविष्ट वडे; नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम पोह्यापासून ढोकळा तयार करण्यासाठी पोहे साफ करून आणि दोन तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
  • त्यानंतर पोहे धुवून त्यातील पाणी काढून घ्या आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • आता पोह्याच्या पेस्टला एका भांड्यात काढून त्यात रवा मिक्स करून घ्या.
  • ढोकळ्यात घालण्यासाठी दही फेटून घ्या आणि त्यात बेकिंग सोडा आणि मीठ घाला.
  • आता ढोकळा बनवण्याच्या भांड्याला तेल लावून घ्या आणि तयार केलेले मिश्रण प्लेटवर पसरवून घ्या.
  • दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेऊन त्यात ढोकळ्याचे भांडे ठेवा. साधारपणे २५-३० मिनिटे ठेवा. अशाप्रकारे मऊ ढोकळा तयार झाला.
  • आता तडका तयार करण्यासाठी तव्यावर तेल ओतून त्याक मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, हळद आणि कढीपत्ता घाला.
  • तयार ढोकळ्यावर हा तडका टाका.
  • अशा प्रकारे पोह्यापासून तयार केलेला ढोकळा खाण्यासाठी सर्व्ह करा.