Green Fried Rice: अनेकांना फ्राईड राईस, बिर्याणी राईस, व्हेज राईस अशा विविध पद्धतीच्या राईस रेसिपी ड्राय करायला आवडतात. आज आम्ही तुम्हाला ग्रीन फ्राईड राईस कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…
ग्रीन फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. ३ कप उकडलेले तांदूळ
२. २ वाटी ब्रोकोली
३. ३ चमचे शिमला मिरची बारीक चिरलेली
४. १/२ कप मूग स्प्राउट्स
५. १/२ कप बारीक चिरलेली पालक
६. १/२ कप हिरव्या कांद्याची पात बारीक चिरलेली
७. १/२ कप चिरलेला कांदा
८. १/२ ग्रीन चिली सॉस
९. २ चमचे रिफाइंड तेल
१०. मीठ चवीनुसार
ग्रीन फ्राईड राईस बनविण्याची कृती:
१. सर्वप्रथम एका नॉनस्टिक पॅन गरम करून, त्यामध्ये तेल टाकून कांदे परतून घ्या.
२. नंतर त्यात ब्रोकोली, शिमला मिरची आणि मोड आलेले मूग दोन मिनिटे शिजवा.
३. त्यानंतर पालक, कांद्याची पात या सगळ्या भाज्या शिजवून घ्या आणि त्यामध्ये मीठ घालून नीट परतून घ्या.
४. हे झाल्यानंतर त्यात ग्रीन चिली सॉस घाला आणि पाच मिनिटे परता.
५. आता त्यात शिजवलेला भात टाकून, भात नीट परतून घ्या.
हेही वाचा: फक्त १० मिनिटांमध्ये बनवा क्रीमी कॉर्न चाट; नोट करा साहित्य आणि कृती
६. तयार गरमागरम ग्रीन फ्राईड राईस सर्व्ह करा.