Harbhrayacha Thecha: भाकरीसोबत मिरचीचा ठेचा आपण नेहमीच आवर्जून बनवतो. पण तुम्ही कधी ओल्या हरभाऱ्याचा ठेचा खाल्लाय का? आज आम्ही तुम्हाला ओल्या हरभाऱ्याचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग लिहून घ्या साहित्य आणि कृती…
हरभाऱ्याचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप ओले हरभरे
- ५-६ हिरव्या मिरच्या
- चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा जिरं
- १ चमचे आलं-लसूण पेस्ट
- २ कांदे
- मीठ आवश्यकतेनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
- ७-८ कढीपत्याची पाने
हरभाऱ्याचा ठेचा बनवण्याची कृती:
हेही वाचा: फक्त उपवासासाठीच नाही आरोग्यासाठीही हे लाडू आहेत खूप पौष्टिक; लिहून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम पॅनमध्ये थोडे तेल टाकून हरभरा आणि लसूण भाजून घ्यावा आणि मिक्सरमध्ये हरभऱ्याची आणि लसणाची जाडसर अशी पेस्ट बनवा.
- आता फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा.
- कांदा लालसर भाजल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिक्स करा.
- मिश्रण परतून झाल्यावर त्यात हरभऱ्याची पेस्ट मिक्स करा.
- आता त्यात चवीनुसार मीठ, कोथिंबीर घाला आणि ५ मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- आता गरम-गरम ओल्या हरभाऱ्याचा ठेचा भाकरीबरोबर सर्व्ह करा.