बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सकाळच्या वेळी मनसोक्त असा नाश्ता खायला मिळत नाही. कारण आवडीचा नाश्ता बनवायचा म्हटलं तर त्यासाठी वेळ जाणार आणि नेमका तोच सध्या लोकांजवळ नाहीये. कारण आजकाल बहुतेक लोक बिझी असतात, त्यामुळे कामाला जायच्या गडबडीत काहीतरी सोपे आणि पटकन होतील असे मॅगी सारखे फास्ट फूड बनवतात आणि खातात.

मात्र, असा अनहेल्दी नाश्ता बनवणं आणि खाणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये झटपट बनवता येऊ शकते अशी हेल्दी आणि चविष्ट ओट्स आप्पे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर ओट्स आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Amla chutney recipe
हिवाळ्यात खा पोषणमूल्यांनी परिपूर्ण आवळ्यांची चटणी! झटपट लिहून घ्या रेसिपी
khakra chaat recipe
सायंकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा कुरकुरीत खाकरा चाट, लिहून…
How To Make Winter Special laddoo
Winter Special laddoo : पाव किलो हरभरा, गुळापासून हिवाळ्यात बनवा पौष्टिक लाडू; २० मिनिटांत होणारी झटपट रेसिपी नक्की ट्राय करा
rice medu vada in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत झटपट बनवा तांदळाचे मेदूवडे; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Solebhaat Recipe
सोलेभात कधी खाल्ला का? तुरीच्या दाणे घालून करा मसाले भात; सोपी रेसिपी एकदा पाहाच, VIDEO VIRAL
Dragon Chicken recipe in marathi Easy and Tasty Indochinese Chicken Starter recipe in marathi
घरी बनवा हॉटेल स्टाइल ड्रॅगन चिकन; ताट पुसून खाल अशी कधीच न खाल्लेली चिकन रेसिपी
Moong-Matki Bhel
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा मूग-मटकी भेळ; वाचा साहित्य आणि कृती
crispy dry shev bhaji
फक्त १० मिनिटांत बनवा झणझणीत सुकी शेव भाजी; मस्त रेसिपी नक्की ट्राय करा

हेही वाचा- हॉटेल स्टाईल दाल खिचडी तडका घरीच बनवूया; ढाब्यावरची परफेक्ट चव कशी द्यायची, चला बघूया

साहित्य –

ओट्स बारीक केलेले १ वाटी, चणाडाळ पाव वाटी (४ ते ६ तास भिजवलेली), मूगडाळ पाव वाटी (४ ते ६ तास भिजवलेली). ब्राऊन तांदूळ पाव वाटी (४ ते ६ तास भिजवलेला), ताक अर्धी वाटी, आले-मिरची-कोथिंबीर पेस्ट १ चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ आणि तेल आवश्यकतेनुसार, साखर १ चमचा.

हेही वाचा- खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती-

प्रथम भिजवलेली चणा, मूगडाळ आणि ब्राऊन तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्या व ४ तास पीठ आंबवण्यास ठेवा. आप्पे करायच्या १ तास आधी ओट्स व ताक वरील बॅटरमध्ये एकत्र करा. आप्पे तयार करायच्या वेळी आलं-मिरची पेस्ट, जिरेपूड, मीठ, साखर घालून मिक्स करा. आप्पे पात्र गॅसवर ठेवून थोडे तेल घालून वरील बॅटर त्यामध्ये ओता व ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा. हे आप्पे कुठल्याही चटणीसोबत खायला चांगले लागतात.