दर रविवारी ब्रेकफास्टला काय करायचं असा प्रश्न सगळ्याच गृहीणींसमोर असतो. रविवारी सगळ्यांना सुट्टी असते मात्र घरातली स्त्री नेहमी ऑन ड्युटी असते. सारखं पोहे, उपीट खाऊनही आपल्याला कंटाळा आलेला असतो. दरम्यान दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या शौकीन लोकांनी आप्पे चाखलेच असतील. इडली-डोशाप्रमाणेच आप्पेही आवडणाऱ्यांची यादी मोठी आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तिखट आप्प्यांचा पौष्टीक नाष्टा. चला तर तिखट आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
तिखट आप्पे साहित्य –
- २ वाट्या तांदूळ
- पाव वाटी उडीद डाळ
- पाव वाटी चणा डळा
- पाव वाटी मूगडाळ
- पाव वाटी पोहे
- मीठ, १ चमचा साखर
- अर्धी वाटी कोथिंबीर
- तेलस वाटण मसाला
- ७-८ हिरव्या मिरच्या, १ इंच आले
तिखट आप्पे कृती –
आदल्या दिवशी सकाळी तांदूळ व सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्यात. रात्री तांदळ, डाळी, आले, मरच्या वाटून सर्व एकत्र करावे. पोहे थोडा वेळ भिजत घालून वाटावेत व वाटलेल्या डाळीस एकत्र करावेत. भजाच्या पिठासारखे पातळ करुन सर्व एकत्र करुन झाकून ठेवावे. सकाळी पिठात मीठ व कोथिंबीर घालावी व आप्पे-पात्र चांगले तापवून घेऊन मंद गॅसवर थोडे थोडे तेल घालून आप्पे करावेत.
हेही वाचा – तुमचीही मुलं चपाती खायला कंटाळा करतात? मग बनवा ही झटपट चायनीज रोटी
तुम्ही हे गरम गरम आप्पे चटणी किंवा सॉसबरोबर खूप टेस्टी लागतात. ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी होते कळवा!