Moong Dosa Recipe: उडदाच्या डाळीचे डोसे आपण अनेकदा खातो. पण, कधी कधी वेगवेगळ्या कडधान्यांचा वापरही तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी करू शकता. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक मुगाचा डोसा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ ही सोपी रेसिपी
मूग डोसा बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- २ वाटी मूग
- अर्धी वाटी तांदूळ
- आल्याचा तुकडा
- ५-६ मिरच्या
- ९-१० कढीपत्त्याची पाने
- अर्धी वाटी कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
मूग डोसा बनविण्याची कृती :
हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा पौष्टिक राजगिऱ्याचा शिरा; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम डोसा करण्याच्या ७-८ तासांपूर्वी मूग आणि तांदूळ एकत्र स्वच्छ धुऊन भिजत घाला.
- ७-८ तासांनी पुन्हा एकदा भिजत घातलेले मूग आणि तांदूळ धुऊन घ्या आणि वाटून घेण्यासाठी मिक्सरमध्ये घाला. या वाटणात आलं, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ व थोडंसं पाणीदेखील घाला.
- मूग आणि तांदळाची ही पेस्ट बारीक झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या.
- एका गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवून, त्यावर डोसे बनवतो त्याप्रमाणे मुगाचे डोसे बनवा.
- दोन्ही बाजूंनी डोसा छान भाजल्यानंतर खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.