Sorghum Idli Recipe: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुले घरीच असतात. अशा वेळी सतत त्यांना काही ना काहीतरी नवनवीन पदार्थ खायचे असतात. बाजारातील पदार्थ सारखे खाणेही आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना झटपट होणारी कोणतीही हेल्दी रेसिपी देऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ज्वारीची इडली कशी बनवायची ते सांगणार आहोत. खरे तर आजपर्यंत तुम्ही तांदूळ, नाचणी, मका यांच्या इडल्या खाल्ल्याच असतील. त्यामुळे आता ज्वारीची इडली कशी बनवायची हेदेखील शिकून घ्या. जाणून घेऊ या रेसिपीचे साहित्य आणि कृती…
साहित्य :
१. २ कप ज्वारी
२. २ कप तांदूळ
३. २ कप उडदाची डाळ
४. २ कप रवा
५. १ वाटी गाजर, बीट किसलेले
६. चिमूटभर खायचा सोडा
७. चवीनुसार मीठ
८. तेल आवश्यकतेनुसार
कृती :
हेही वाचा: तुमच्या मुलांसाठी घरीच बनवा ‘आंब्याचा टेस्टी जाम’; पटकन नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी
१. सर्वांत आधी तांदूळ, उडीद डाळ, ज्वारी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
२. त्यानंतर सहा-सात तासांसाठी हे सर्व वेगवेगळ्या पाण्यात भिजवा.
३. सहा-सात तासांनंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्या.
४. वाटलेल्या मिश्रणामध्ये रवा मिसळा आणि हे मिश्रण एकसारखे ढवळून घ्या.
५. त्यानंतर या पिठात मीठ, किसलेले गाजर, बीट व सोडा घाला.
६. मग इडली पात्रात नेहमी इडल्या बनवतो तशा बनवा.
७. अशा प्रकारे तयार केलेल्या ज्वारीच्या इडल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत वाढा.