सुट्टीच्या दिवशी घरी हमखास नॉन व्हेज बनवण्याचा बेत असतो. त्यातच चिकन हे अनेकांचे आवडते. चिकन टिक्का, चिकन मसाला, बटर चिकन आदी अनेक पदार्थ आपण नेहमी घरी बनवतो आणि खाण्याचा आनंद लुटतो. पण, तुम्ही कधी घरच्या घरी चिकन सूप बनवून पाहिलं आहे का ? नाही, तर आज आपण आळणी पाणी (चिकन सूप ) कसं बनवायचे हे पाहणार आहोत. हे चिकन सूप प्यायला चविष्ट आणि बनवायला सोपे सुद्धा आहे.
साहित्य :
- चिकन
- तूप किंवा तेल
- वेलची
- दालचिनी
- लवंग
- हळद
- टोमॅटो, खोबरं, कांदा, आलं, लसूण – पेस्ट
- मीठ
हेही वाचा…संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत, चविष्ट टोमॅटो स्टिक; पाहा सोपी रेसीपी
कृती :
- बाजारातून तुम्ही चिकन आणा.
- चिकन धुवून घ्या व शिजवून घ्या.
- कुकरमध्ये किंवा एका भांड्यात तूप किंवा तेल घालून त्यात कांदा घाला आणि २ मिनिटे परतवून घ्या.
- नंतर त्यात चिकन, वेलची, दालचिनी, लवंग, मीठ घाला आणि ५ मिनिटे परतून घ्या.
- नंतर पाणी घाला. दोन ते पाच मिनिटे तसाच ठेवा. (चिकन शिजल्यानंतर बंद करा).
- चिकन पूर्ण शिजलं की, त्यातून चिकन वेगळं करा. ( किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात चिकन ठेवू सुद्धा शकता) .
- त्यानंतर मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, खोबर, आलं, लसूण घालून (फक्त एक चमचा ) पेस्ट करून घ्या.
- ही पेस्ट चिकन काढून घेतलेल्या पाण्यात टाका. त्यानंतर दोन मिनिटे शिजवून घ्या आणि गॅस बंद करा.
- अशाप्रकारे तुमचे चिकन सूप तयार.