उद्या म्हणजेच ९ एप्रिल २०२४ रोजी मंगळवारी हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. उद्या गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. या दिवशी दारात रांगोळी, दाराला तोरण, तर गुढी उभारून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जाईल. तर यानिमित्त घरी एखादा गोड पदार्थ तर नक्कीच बनवला जाईल. तर आज आपण गुढीपाडव्या निमित्त ‘शेवयाची खीर’ कशी बनवायची हे पाहणार आहोत.
साहित्य:
- एक चमचा तूप
- बारीक शेवया
- गरम पाणी
- १/४ कप साखर
- दोन कप दूध
- बदाम, काजू, मनुका
- केशर (दुधात भिजवलेला)
- वेलची पावडर
हेही वाचा…झणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…
कृती –
- एक वाटी बारीक शेवया तुपात खरपूस भाजून घ्या त्यात दोन वाटी गरम पाणी घाला व थोडा वेळ शिजू द्या.
- नंतर त्यात दोन कप दूध घाला. (तुमच्या आवडीनुसार तुम्ही या दुधात केशर मिक्स करून घालू शकता).
- नंतर त्यात साखर, काजू, बदाम, मनुका घाला.
- शिजवून घेतल्यानंतर वरून वेलची पावडर टाका.
- अशाप्रकारे तुमची ‘शेवयाची खीर’ तयार.