केकच्या दुकानात पेस्ट्री, केक बरोबर आवर्जून दिसणारा ‘कपकेक’ हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. केकच्या दुकानात विविध फ्लेवर्सचे छोटे-छोटे कपकेक पाहून खाण्याची प्रत्येकालाचं इच्छा होते. तुम्ही आतापर्यंत स्ट्रॉबेरी, चॉकलेट, रेड व्हेलवेट आदी अनेक प्रकारचे कपकेक खाल्ले असतील. पण, तुम्ही कधी ‘स्टीम कपकेक’ खाल्ला आहे का ? नाही… तर मोजक्या साहित्यात स्टीम कपकेक कसा बनवायचा चला पाहूया. सोशल मीडियावर एका युजरने या पदार्थाची सोपी रेसिपी दाखवली आहे. तुम्ही सुद्धा साहित्य आणि कृती लगेच लिहून घ्या.
साहित्य –
- १ कप रवा , १ कप तांदळाचे पीठ, १ चमचा तूप किंवा तेल, १ कप दूध, २ चमचे दूध पावडर, इनो, किसलेलं खोबर , गूळ, मीठ.
हेही वाचा…घरच्या घरी फक्त दहा मिनीटांत करा ‘चीज ब्रेड पिझ्झा’; साहित्य अन् कृती लगेच लिहून घ्या
कृती –
- एका बाउलमध्ये रवा, तांदळाचे पीठ, मीठ व एक कप दूध, दोन चमचे दूध पावडर घाला व मिक्स करा. नंतर इनो आणि थोडं दूध घाला आणि चांगले मिक्स करा.
- १५ मिनिटे मिश्रण तसंच राहू द्या.
- त्यानंतर चार ते पाच कप घ्या आणि त्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्या.
- नंतर तयार केलेल्या मिश्रण थोडं घाला. नंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा गूळ घातलेला किस टाका. नंतर पुन्हा मिश्रण घाला.
- त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात एक प्लेट ठेवा आणि त्यात हे कप ठेवा व १० मिनिटे वाफवून घ्या.
- अशाप्रकारे तुमचे ‘स्टीम कपकेक’ तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @salivating_cuisine93 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अगदी निवडक साहित्यात १५ ते २० मिनिटांत तुम्ही ‘स्टीम कपकेक’ घरी सहज बनवू शकता. हा ‘स्टीम कपकेक’ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण खाऊ शकतात. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मऊ, स्वादिष्ट ‘स्टीम कपकेक’ बनवा.