Masala Poli Recipe: अनेकदा घरात शिळी पोळी शिल्लक राहते. अशावेळी त्या पोळीचे काय करावे? असा प्रश्न महिलांना पडतो. याच शिळ्या पोळीपासून तयार केली जाणारी खास रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घ्या साहित्य आणि कृती
मसाला पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- शिळ्या पोळ्या
- २ बारीक चिरलेला कांदा
- २ बारीक चिरलेले कांदा
- १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा तिखट
- १ चमचा चाट मसाला
- चवीपुरते मीठ
- तेल आवश्यकतेनुसार
मसाला पोळी बनवण्याची कृती:
हेही वाचा: फक्त पाच मिनिटांत बनवा ओल्या हरभाऱ्याचा झणझणीत ठेचा; लिहून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वात आधी कांदा, टॉमेटो, कोथिंबीर एकत्र करुन त्यावर चाट मसाला, मीठ आणि तिखट करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- नंतर शिळ्या पोळीवर तेल सोडून थोडी पापडाप्रमाणे कडक भाजून घ्यावी.
- आता पोळी एका ताटात काढून त्यावर तयार केलेले मिश्रण त्यावर घालावे.
- तयार गरमागरम मसाला पोळी सॉसबरोबर सर्व्ह करावी.