भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अत्यंत वैविध्यपूर्ण आहे ज्यामध्ये भाजी पोळी-डाळ भात हा महत्त्वाचा आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकदा चटणी, कोशिंबीर, लोणचं , पापड, कुरडई असे पदार्थ तोंडी लावले जातात. आपल्याकडे चटण्यांचे आणि पापडाचे अनेक प्रकार आहेत. उडीदाचा पापड, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड असे कित्येक प्रकारचे पापड तुम्ही खाल्ले असतील. तसेच शेंगदाण्याची चटणी, कडीपत्त्याची चटणी, लसून-खोबऱ्याची चटणी अशा वेगवेगळ्या चटण्या तुम्ही नेहमी खाता. पण तुम्ही कधी पापडाची चटणी खाल्ली आहे का? नाही तर मग रेसिपी एकदा नक्की खाऊन पाहा.

दगडी खलबत्यामध्ये झटपट बनवा पापडाची चटणी

पापडाची चटणी हे ऐकायला कितीही विचित्र वाटत असले तरी ही चटणी चवीला अत्यंत चविष्ट असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही चटणी सर्वांना आवडेल. तुम्हाला त्यासाठी फार खर्च करण्याची आवश्यकता नाही. स्वयंपाकघरात असलेल्या साहित्यापासून ही चटणी झटपट तयार करता येते. काही लोक पापडाची चुरी असे म्हणतात. पापड आणि कांद्याची चटणी देखील अनेकांना खायला आवडते. आज आपण दगडी खलबत्यामध्ये पापडाची चटणी कशी बनवावी हे जाणून घेऊ या… मग वाट कसली पाहात आहात, झटपट नोट करा रेसिपी..

येथे पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लाडक्या कृष्णासाठी बनवा दहीकाला! सोपी आणि झटपट तयार होणारी पौष्टिक रेसिपी, लिहून घ्या

पापडाची चटणीची रेसिपी

पापडाची चटणी तयार करण्यासाठी साहित्य

  • ३ उडीद डाळीचे पापड
  • अर्धा कप – खारे दाणे
  • अर्धा कप – फुटाने, भाजलेले काळे चणे
  • १५-१६ -लसणाच्या पाकळ्या
  • १ टेबल स्पून लाल मिर्ची पावडर
  • मीठ चवीनुसार

हेही वाचा – तुम्हाला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर घरीच बनवा मसाला कॉर्न, एकदा खाल तर खातच रहाल

पापडाची चटणी तयार करण्यासाठी कृती

  • प्रथम गॅसवर किंवा तवा गरम करून उडीद डाळीचे पापड भाजून घ्या.
  • त्यानंतर पापडाचे तुकडे करून खलबत्यामध्ये टाका आणि पापडाचा भुगा करून घ्या.
  • त्यानंतर खलबत्यामध्ये लसून, फुटाणे, खारे दाणे, लाल मिर्ची पावडर आणि मीठ टाकून बत्याने चांगले बारीक करून घ्या.
  • सर्व चटणी चांगली एकजीव करून घ्या.
  • तुमची चविष्ट पापडाची चटणी तयार आहे.

हेही वाचा – तूर आणि वालाची मसाला खिचडी; रात्रीच्या जेवणाला १० मिनिटांत बनवा अस्सल महाराष्ट्रीयन बेत

गरमा गरम डाळ भातासह ही चटणी खाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. इंस्टाग्रामावर Maharashtrian_recipes नावाच्या पेजवर ही रेसिपी पाहू शकता.