Rice Medu Vada: उडदाचा किंवा रव्याचा मेदूवडा तुम्ही आतापर्यंत नक्की ट्राय केला असेल पण, आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पीठाचा पौष्टिक मेदूवडा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोपी रव्याच्या मेदूवड्याची रेसिपी
तांदळाचे मेदूवडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप तांदळाचे पीठ
- ३-४ बटाटा
- १ चमचा किसलेलं आलं
- ३-४ हिरव्या मिरच्या
- तेल
- मीठ
तांदळाचे मेदूवडे बनवण्याची कृती:
हेही वाचा: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा मूग-मटकी भेळ; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम गॅसवर टोप ठेऊन त्यात पाणी घाला आणि पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर त्यात तूप आणि मीठ घाला.
- नंतर पाणी ढवळून त्यात तांदळाचे पीठ घालावे आणि झाकण ठेवून वाफ काढावी.
- तांदळाचे उकडलेले पीठ व्यवस्थित मळून त्यात उकडलेला बटाटा, मीठ घाला आणि या मिश्रणाचे मेदूवड्याप्रमाणे बारीक वडे तयार करा.
- आता हे तांदळाचे वडे गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- तयार गरमागरम कुरकुरीत तांदळाचा मेदूवडा चटणीबरोबर सर्व्ह करा.