rice vade recipe: नाश्त्यासाठी तेच-तेच पदार्थ खायचा कंटाळा येतो. दरवेळी काहीतरी नवीन काय बनवावं? असा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी चटपटीत आणि पौष्टिक तांदळाचे वडे कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तांदळाचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३ वाटी तांदूळ (६-७ तास भिजत ठेवलेले)
  • ४-५ उकडलेले बटाटे
  • १ वाटी बेसन
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा हळद
  • आल्याचा बारीक तुकडा
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार
  • १ वाटी कोथिंबीर

तांदळाचे वडे बनवण्याची कृती:

हेही वाचा: उपवासाच्या दिवशी फक्त ५ मिनिटांत झटपट बनवा मखाण्याचा चिवडा; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात उकडलेला बटाटा सोलून त्याचे बारीक काप करून घ्या.
  • त्यानंतर त्यात मिरची आणि आल्याची पेस्ट घाला.
  • आता त्यात तांदळाची पेस्ट, बेसन, कांदा, लाल तिखट, हळद, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे.
  • तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर कढईत तेल गरम करण्यास ठेवा.
  • तेल गरम झाल्यावर या तांदळाच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या.
  • तयार गरमागरम चवदार तांदळाचे वडे नारळाच्या चटणीसह सर्व्ह करा.