Sweet Lapsi Recipe: लहान मुलांना गोड पदार्थ खायला खूप आवडतात. पण भूक लागण्यावर ते नेहमी बिस्किट, चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. अशावेळी तुम्ही त्यांना पौष्टिक गोड लापशी खाऊ घाला. ही लापशी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया गोड लापशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…
गोड लापशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. २ कप लापशी
२. ३ चमचे तूप
३. २ कप गूळ
४. १/२ वाटी ओल्या खोबऱ्याचे बारीक काप
५. ५-६ केशर काड्या
६. ८-९ काजूचे तुकडे
७. ७-८ मनुके
८. ४-६ पिस्त्याचे तुकडे
९. ५-६ बदामाचे तुकडे
१०. ३ हिरवी वेलची
११. ४ कप पाणी
गोड लापशी बनवण्याची कृती:
१. सर्वात आधी एका भांड्यात तूप गरम करून त्यात वरील सर्व ड्रायफ्रुट्स परतून घ्या.
२. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे काप देखील परता आणि फ्राय केलेली सर्व सामग्री एका प्लेटमध्ये काढून घ्या.
३. त्यानंतर त्याच भांड्यात पुन्हा तूप घालून लापशी परतून घ्या, लापशी परतल्यानंतर एका ताटात काढून घ्या.
४. आता पुन्हा त्याच भांड्यात पाणी ओता आणि त्यात गूळ टाका.
५. पाण्यात गूळ व्यवस्थित विरघळल्यानंतर त्यात भाजलेली लापशी घाला.
६. हे मिश्रण परतून त्यावर केशर आणि वेलची पूड टाकून झाकण ठेवा.
७. काही वेळ लापशी शिजू द्या, लापशी शिजल्यानंतर त्यावर फ्राय केलेले खोबरे, काजू, मनुके आणि बदाम घाला.
हेही वाचा: या सोप्या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल ‘मिक्स दाल तडका’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
८. पुन्हा लापशीवर झाकण ठेवून १०- १५ मिनिटे शिजू द्या.
९. त्यानंतर तयार गरमागरम लापशी सर्वांना सर्व्ह करा.