Kabuli Chana Kebabs: रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. तेच तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काबुली चन्याचे टेस्टी कबाबची कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

काबुली चन्याचे कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप भिजलेले काबुली चने
  • १ कप पनीर
  • १ कप उकडलेला बटाटा
  • ६ चमचे तूप
  • २ चमचा तेल
  • २ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ४ बारीक चिरलेल्या मिरच्या
  • १ चमचा जीरे
  • २ चमचा धने पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा आमचूर पावडर
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर
  • मीठ चवीनुसार

काबुली चन्याचे कबाब बनवण्याची कृती :

हेही वाचा: मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी

  • सर्वात आधी कढईत तेल गरम करुन त्यात भिजवलेले चने खरपूस परतून घ्या आणि परतताना त्यात धने पावडर, आलं, हिरवी मिरची टाका.
  • नंतर त्यात गरम मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ टाकून मिश्रण परतून एकजीव करा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करा.
  • दुसऱ्या एका बाऊलमध्ये बटाटा आणि पनीर एकत्र कुस्करून घ्या आणि त्यात मिक्सरमधली चन्याची पेस्ट टाका.
  • आता हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात मीठ आणि धने पावडर टाका हे मिश्रण एकत्र मळून घ्या.
  • त्यानंतर हातावर थापून त्याचे गोल कबाब बनवा आणि गरम तेलात फ्राय करा.
  • तयार गरमागरम कबाब सॉसबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader