Malpuwa Recipe: दिवाळीच्या दिवसात बाहेरून मिठाई मागवण्याऐवजी घरच्या घरी आवडीचा एखादा पदार्थ करायचा ठरवला तर बाहेरच्यापेक्षा नक्कीच कमी कॅलरीज पोटात जातील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी मालपुवा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

मालपुवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • दीड लिटर स्कीम्ड दूध (साय काढलेले)
  • ५० ग्रॅम पनीर बारीक केलेले
  • २ मोठे चमचे गव्हाचे पीठ
  • १ मोठा चमचा रवा
  • १/२ चमचा वेलचीपूड
  • तेल आवश्यकतेनुसार
  • ड्राय फ्रुट्सचे काप

पाकासाठी:

  • १ कप साखर
  • १ कप पाणी
  • थोड्या केशराच्या काड्या

मालपुवा बनवण्याची कृती:

हेही वाचा: दिवाळीत लाडू, करंज्या बनवायला वेळ नाही? मग किमान बालूशाहीची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

  • दूध एका जड बुडाच्या भांड्यात गरम करायला ठेवा, उकळी आल्यावर आच कमी करा आणि अधूनमधून ढवळून ते आटवून घ्या.
  • दूध आटल्यानंतर त्यामध्ये किसलेले पनीर घाला आणि व्यवस्थित ढवळून मिक्स करा. गॅस बंद करून हे मिश्रण रूम टेम्परेचरला येईपर्यंत थांबा.
  • एक कप साखरेपैकी दोन मोठे चमचे साखर बाजूला काढून उरलेल्या साखरेचा एकतारी पाक करून घ्या. या पाकामध्ये केशराच्या काड्या चुरडून टाका.
  • हा पाक तयार झाला की, बाजूला ठेवा.
  • आता तयार करून ठेवलेल्या दूध-पनीरच्या मिश्रणात कणीक, रवा आणि वेलचीपूड घालून हलवा. उरलेली साखरही आटवलेल्या दुधात घाला. नीट हलवा आणि गरज असल्यास थोडं दूध घालून सारखं करून घ्या. 
  • आता एका मोठ्या पॅनमध्ये पुरेसं तेल गरम करून हे मिश्रण घालून पॅनकेकसारखं पसरवा. हे मध्यम ते बारीक आचेवर काही मिनिटं शिजू द्या. थोडा रंग बदलायला लागला की, उलटवा.
  • दोन्ही बाजूंनी मालपुवा हलक्या रंगावर चांगला झाल्यानंतर काढून घ्या.
  • त्यानंतर त्यावर थोडा साखरेचा पाक घाला. ड्रायफुट्सचे काप घाला आणि गरमागरम सव्‍‌र्ह करा.