Nachni Ladu: हिवाळ्याच्या दिवसात अनेक घरांमध्ये विविध लाडू बनवले जातात. ज्यात शेंगदाण्याचे, बेसनाचे, डिंकाचे लाडू अशा विविध प्रकारच्या लाडवांचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला नाचणीच्या पौष्टिक लाडू रेसिपी सांगणार आहोत. हा लाडू पौष्टिक असून बनवायला एकदम सोप्पा आहे.
नाचणीचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ३ कप नाचणीचे पीठ
- २ कप तूप
- दीड कप गूळ
- १ चमचा वेलची पूड
- १ वाटी ड्रायफ्रुट्स
नाचणीचे पौष्टिक लाडू बनवण्याची कृती:
हेही वाचा: एक वाटी रव्यापासून झटपट बनवा कुरकुरीत रवा वडे; पटकन वाचा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी एका कढईत तूप गरम करून त्यात ड्रायफ्रुट्स भाजून घ्या.
- त्यानंतर ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून त्यात आणखी तूप घालून नाचणीचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या.
- पीठ व्यवस्थित भाजले गेले की त्यात वेलची पूड, गूळ घालून सर्व मिश्रण एकजीव करा आणि त्यात ड्रायफ्रुट्स घाला.
- या तयार मिश्रणाचे लाडू बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या.