Ragi chips Recipe: लहान मुलं सतत चिप्स खाणं पसंद करतात. परंतु बाहेरचं असे पदार्थ खाल्ल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी पौष्टिक नाचणीच्या पीठापासून चटपटीत चिप्स तयार करू शकता.
नाचणीचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी नाचणीचं पीठ
- १/२ वाटी गव्हाचं पीठ
- १ चमचा लाल मिरची पावडर
- १ चमचा चाट मसाला
- मीठ चवीनुसार
- पाणी (पिठ मळण्यासाठी)
- तेल
- मायक्रोवेव्ह
- बेकिंग ट्रे
नाचणीचे चिप्स बनवण्याची कृती:
हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वातआधी एका भांड्यात नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, एक चमचा तेल टाकून पाण्याने मळून घ्या.
- मळलेल्या पीठाला काही मिनिट झाकून ठेवा.
- ठराविक मिनिटानंतर मळलेल्या पीठाचे लहान-लहान गोळे करून घ्या.
- आता ते गोळे चपाती प्रमाणे लाटून घ्या आणि चाकूच्या मदतीने त्याचे शंकरपाळी प्रमाणे काप करा.
- एका ब्रशच्या मदतीने कापलेल्या कापांवर तेल लावून घ्या.
- आता, मायक्रोवेव्ह १८० अंश सेंटीग्रेडवर १० मिनिट प्री-हीट करून बेकिंग ट्रेला ग्रीस करू त्यावर कापलेले सर्व काप बेक करा.
- पहिले ७-८ मिनिटे एका बाजूने बेक करून घ्या आता मायक्रोवेव्ह उघडून दुसऱ्या बाजूने ७-८ मिनिट बेक करून घ्या. वेळ पूर्ण झाल्यानंतर मायक्रोवेव्ह बंद करून ठेवा.
- तयार नाचणीचे काप मसाल्याबरोबर मिक्स करून त्याचा आस्वाद घ्या.