Ragi Cutlets Recipe: आजपर्यंत तुम्ही पनीर कटलेट, व्हेज कटलेट नक्कीच खाल्ले असेल पण, आज आम्ही तुम्हाला नाचणीचे कटलेट कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या नाचणीचे पौष्टिक कटलेट
नाचणीचे पौष्टिक कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी मोड आलेली नाचणी
- ३ उकडलेले बटाटे
- २ मोठे चमचे बेसन
- १ चमचे लाल मिरची पावडर
- १ चमचे धणे पावडर
- १ चमचे जिरे पावडर
- १ चमचे गरम मसाला पावडर
- १/२ चमचे साखर
- १ वाटी कोंथिबीर
- १ वाटी पोहे
- चवीपुरते मीठ
- तळण्यासाठी तेल
नाचणीचे पौष्टिक कटलेट बनवण्याची कृती:
हेही वाचा: मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम मोड आलेली नाचणी मिक्सरला पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- त्यानंतर एका पातेल्यात घेऊन, त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घाला.
- नंतर बेसन आणि सर्व मसाले घालून कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
- त्यानंतर त्यात चवीपुरते मीठ घालून आणि सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
- आता पोहे मिक्सरमध्ये वाटून या मिश्रणात एकत्र करावे.
- फ्राय पॅनमध्ये थोडे तेल घालून त्याचे छोटे-छोटे कटलेट फ्राय करावे.
- तयार गरमागरम नाचणीचे पौष्टिक कटलेट सॉसबरोबर सर्व्ह करा.