Rajgira Sheera: तुम्ही रव्यापासून बनवलेला शिरा अनेकदा खाल्ला असेल. त्याशिवाय बटाट्याचा आणि रताळ्याचा शिराही तुम्ही एकदा तरी ट्राय केलाच असेल. पण, आज आम्ही तुम्हाला राजगिऱ्याचा चविष्ट आणि पौष्टिक शिरा कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजगिऱ्याचा शिरा बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ४-५ चमचे राजगिऱ्याचे पीठ
  • ३ चमचे किसलेला गूळ
  • १ चमचा वेलची पूड
  • अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स
  • ३ चमचे तूप
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • १-२ केळी

राजगिऱ्याचा शिरा बनविण्याची कृती:

हेही वाचा: आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात राजगिऱ्याचे पीठ घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि गूळ घालून त्याची पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर एका भांड्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात राजगिरा आणि गुळाची पेस्ट मिसळा करा.
  • मिश्रण थोडे परतवून घ्या आणि ते परतल्यावर त्यात वेलची पावडर, केळी घालून मिश्रण पुन्हा ४-५ मिनिटे पुन्हा परतून घ्या.
  • आता तयार शिऱ्यावर ड्रायफ्रूट्स घालून, तो सर्व्ह करा.