Bhakri Upma: बऱ्याचदा रात्रीची शिळी भाकरी उरते, उरलेली भाकरी सहसा कोणी खात नाही, त्यामुळे अनेकदा ती फेकून दिली जाते. पण, अन्न कधीही वाया घालवू नये, अशावेळी तुम्ही उरलेल्या भाकरीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी त्याचा टेस्टी उपमा नक्कीच ट्राय करू शकता; जो चवीला चवदार आणि पौष्टिकही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाकरीपासून उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. उरलेली भाकरी
२. २ कांदे (बारीक चिरलेले)
३. ६-७ हिरव्या मिरच्या
४. १ चमचा जिरे
५. १ चमचा मोहरी
६. कोथिंबीर
७. कढीपत्ता
८. तेल आवश्यकतेनुसार
९. मीठ चवीनुसार

भाकरीपासून उपमा बनवण्यासाठी कृती:

१. सर्वात आधी रात्री उरलेली भाकरी पाच मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून ती पटकन बारीक होईल.

२. त्यानंतर भाकरी नरम झाल्यावर तिचे बारीक तुकडे करून घ्या आणि हे तुकडे मिक्सरमधून वाटून घ्या. तोपर्यंत गॅसवर कढई तापत ठेवा.

३. कढई तापल्यावर त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, मिरची भाजून घ्या.

४. त्यानंतर त्यात थोडी हळद आणि बारीक केलेली भाकरी टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.

हेही वाचा: रात्रीच्या उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत भजी; नोट करा साहित्य आणि कृती

५. आता त्यात चवीनुसार मीठ टाकून दहा मिनिटं छान परतून घ्या. परतलेल्या भाकरीवर कोथिंबीर घाला.

६. तयार गरमागरम भाकरीचा उपमा सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make nutritious upma from leftover bhakri write down ingredients and recipes quickly sap
Show comments