डोस्याचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. गरम डोस्यासोबत सांबर आणि चटणी खाणं हा अनेक खव्वयांच्या आवडीचा विषय असतो. डोसा या खाद्यपदार्थाला अनेक खाद्यप्रेमींची पहिली पसंती असते. डोसा हा प्रामुख्याने दक्षिण भारतीय लोकांचा आवडता नाश्त्याचा पदार्थ असला तरी, आता तो सर्व भारतीयांच्या आवडीचा पदार्थ बनत चालला आहे.
याच सर्वांच्या पसंतीच्या चविष्ट ओटस् मूग डोस्याची रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही घरबसल्या बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि ती बनवण्याची कृती. ओटस् मूग डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे.
हेही वाचा- गव्हाची खीर कधी खाल्लीये का? नसेल तर आजच बनवा हेल्दी आणि चविष्ट रेसिपी
साहित्य –
- बारीक रवाळ केलेले ओट्स
- १ वाटी, मूगडाळ अर्धा वाटी (४ तास भिजवलेली)
- ताक अर्धी वाटी
- आले- मिरची-कोथिंबीर यांची पेस्ट १ चमचा
- जिरे पावडर अर्धा चमचा
- तेल, मीठ आवश्यकतेनुसार आणि साखर १ चमचा.
हेही वाचा- ज्वारीचा उपमा कधी खाल्लाय? नसेल तर आजचं घरी बनवा ही हेल्दी रेसिपी
कृती –
प्रथम भिजवलेली मूगडाळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर बारीक केलेले ओट्स व वाटलेली डाळ आणि ताक घालून एकत्र करा. हे पीठ अर्धा ते एक तास भिजत ठेवा. हे बॅटर सरसरीत असावं. बॅटरमध्ये मीठ, साखर आवश्यकतेनुसार घालून जिरे पावडर, आलं-मिरची यांची पेस्ट मिक्स करा. डोसा पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल लावून त्यावर बॅटर पसरवून डोसे मध्यम आचेवर तयार करा. कुठल्याही चटणीसोबत खायला द्या.