भारतीय पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. यामध्ये लाडूचा आस्वाद घेणारी अनेक मंडळी आहेत. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. यामध्ये रवा, बेसन, तीळ, खोबर, बुंदी, शेव आदी प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक जण त्यांच्या आवडी निवडी नुसार हे लाडू खात असतात. लाडू तयार करणे हे एक कौशल्याचे काम आहे. अनेक स्वयंपाकघरात शेंगदाण्याच्या कुट करून ठेवलेला डब्बा देखील ठेवलेला असतो. तर लहानपणी काही तरी गोड खाण्याची इच्छा झाली की, आई या शेंगदाण्याच्या कुटाचा हातावर लाडू वळून आपल्याला खायला द्यायची. तर आज आपण हेच शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर पाहू या पदार्थाची सोपी कृती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य –

१. दोन वाट्या शेंगदाणे
२. एक वाटी सुखं खोबर
३. एक वाटी गूळ

हेही वाचा…घरच्या घरी बनवा मक्यापासून पौष्टीक कटलेट; लहान मुलांनाही भरपूर आवडतील, साहित्य व कृती लगेच लिहून घ्या

कृती –

१. दोन वाटी शेंगदाणे घ्या. पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्या व त्यांची साले काढून टाका.
२. मिक्सरला शेंगदाणे जाडसर बारीक करून घ्या.
३. नंतर यामध्ये सुरीने बारीक करून गूळ, सुख खोबर अर्धी वाटी घाला आणि पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. {आवडीनुसार बदाम, काजू, पिस्ता हे ड्रायफ्रूट्स घालून सुद्धा तुम्ही हे लाडू करू शकता. }
४. त्यानंतर मिश्रण एक ताटात काढून घ्या आणि लाडू वळण्यास सुरुवात करा .
५. अशाप्रकारे तुमचे ‘शेंगदाण्याचे लाडू’ तयार.

गूळ, शेंगदाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा गुळाचा जास्त वापर केला जातो. खरंतर साखर आणि गुळ दोन्ही उसापासून तयार केले जातात. मात्र, गूळ साखरेच्या तुलनेने आरोग्यास फायदेशीर आहे. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते. शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो. तर गूळ खाणं जास्त फायदेशीर असले तरीही ते अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ गरम असतो.

तर शेंगदाण्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. ते केवळ भरपूर ऊर्जाच नाही तर प्रथिनांनी देखील समृद्ध असतात. तर हे आरोग्यासाठी गुणकारी फायदे लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा गूळ आणि शेंगदाण्यापासून तयार केलेलं पौष्टीक लाडू बनवा. हे लाडू तुम्ही पंधरा दिवसांपर्यंत कोणतीही चिंता न करता खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make peanut laddu or shengdana ladoo in maharastrian style try this in your home just 15 minutes recipe must try asp