Ragi Satwa Recipe: भारतातील अनेक घरांमध्ये लहान बाळांसाठी नाचणी सत्व हा उत्तम आहार मानला जातो. नाचणी सत्वामध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी नाचणी सत्व कसे बनवायचे सांगणार आहोत.
नाच सत्व बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ वाटी नाचणी
- १ वाटी किसलेले ओले खोबरे
- १ वाटी गूळ
- १ चमचा तूप
- वेलची पावडर चिमूटभर
- ड्रायफ्रुट्स गरजेनुसार
- मीठ चवीनुसार
- पाणी गरजेनुसार
नाच सत्व बनवण्याची कृती:
हेही वाचा: चविष्ट आणि पौष्टिक मटार पराठा फक्त १० मिनिटांत बनवा; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी नाचणी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी नाचणी चांगली धुवून घ्या.
- त्यानंतर मिक्सरमध्ये नाचणी आणि ओले खोबरे वाटून त्याची पातळ पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या.
- या पेस्टमध्ये गूळ घालून पेस्टमध्ये गरजेनुसार पाणी घालावे.
- आता नाचणी सत्व गॅसवर मंद आंचेवर शिजू द्यावे आणि सतत ते ढवळत राहावे.
- नाचणी शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ टाकावे.
- त्यानंतर नाचणी सत्वात सुकामेवा टाकून बाळाला खाऊ घालावा.