अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. कारण, गणपती हे दैवत अनेकांना आवडतं. सध्याच्या तरुणाईलाही गणपती बाप्पाचं असणारं आकर्षण त्यांच्या मोबाईलच्या स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरुन दिसून येतं. शिवाय अनेकांचा या दिवशी उपवास असतो. आजही संकष्टी चतुर्थी आहे आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला संकष्टीसाठी नेवैद्य बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. आपण आजपर्यंत विविध प्रकारचे गुलाबजाम खाल्ले असतील पण आज तुम्हाला रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत.
रताळ्याचे गुलाबजाम हा पदार्थ संक्रांतीच्या सुमारास केला जातो. ‘अ’ जीवनसत्त्व, अँटिऑक्सिडंट्स यांनी समृद्ध आणि रक्तशर्करा नियंत्रित ठेवणाऱ्या रताळ्याचा आजकाल ‘सुपरफूड’ म्हणून सर्वत्र वापर केला जातो. त्यामुळे या गुलाबजाम बनल्यास तुमची गोडही खाण्याच इच्छा पुर्ण होईल शिवाय शरीराच्या स्वास्थ्यासाठीही त्याचा उपयोग होईल. चला तर जाणून घेऊया रताळ्याचा गुलाबजाम करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेही वाचा- मऊ लुसलुशीत शिरा खायला तुम्हालाही आवडतो? तर ट्राय करा ‘मुगाचा शिरा’, जाणून घ्या ही भन्नाट रेसिपी
साहित्य –
- मध्यम आकाराची ३ रताळी (४०० ग्रॅम)
- खवा किंवा मिल्क पावडर २ मोठे चमचे
- थोडेसे वेलची दाणे
- मैदा २ मोठे चमचे
- गरजेपुरते मीठ, गुलाबजाम तळण्यासाठी रिफाइंड तेल. पाकासाठी २ कप साखर, २ कप पाणी
हेही वाचा – कच्च्या टोमॅटोची झणझणीत चटणी कधी ट्राय केलीय? नसेल तर आजचं बनवा ही सोपी रेसिपी
कृती –
सर्वात आधी रताळी स्वच्छ धुवून, त्यांची सालं काढा त्यानंतर ते उकडून गार झाल्यावर त्याचा लगदा करून घ्या. तो साधारण ३ वाट्या व्हायला हवा. त्या लगद्यामध्ये मैदा घालून मिसळून घ्या. हाताला पाणी लावून घ्या. मिश्रणाची खोलगट वाटी तयार करून त्यात एक वेलची दाणा आणि पाव लहान चमचा खवा मध्यभागी भरून गोल वळा. त्यानंतर कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा. मात्र यावेळी गुलाबजाम कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर साखरेचा दोन तारी पाक करून तो गरम असतानाच त्यामध्ये तळलेले गुलाबजाम घाला. हे गुलाबजाम चांगले मुरवा आणि त्यानंतर तो तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून पुन्हा ते मनसोक्त खा.