Sabudana Khichdi Recipe: अनेकदा उपवासाच्या आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडावा लागतो. पण, आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्यात साबुदाणा आदल्या दिवशी भिजत न घालताही तुम्ही फक्त १० मिनिटांत साबुदाण्याची खिचडी बनवू शकता.

साहित्य:

  • दीड कप साबुदाणा
  • तूप
  • अर्धा चमचा साखर
  • १ कप शेंगदाण्याचे कूट
  • १ चमचा जिरे
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • २ उकडलेले बटाटे
  • चवीनुसार उपवासाचे मीठ

कृती:

हेही वाचा: Navratri Special : साबुदाणा खिचडी नको असेल तर उपवासाची भाकरी एकदा खाऊन पाहा, झटपट नोट करा रेसिपी

  • साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी एका भांड्यात साबुदाणा घेऊन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.
  • आता या धुतलेल्या साबुदाण्यामध्ये एक चमचा वितळलेले देशी तूप, मीठ आणि साखर घालून चांगले मिक्स करा.
  • त्यानंतर साबुदाणा एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा आणि मापून त्यात ५ चमचे पाणी घाला.
  • आता प्रेशर कुकरमध्ये १/२ इंच पाणी भरून त्यात साबुदाण्याने भरलेला डब्बा झाकून ठेवा आणि कुकूरला ४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.
  • चार शिट्ट्या झाल्यावर कुकरमधील साबुदाण्याचा डब्बा बाहेर काढून घ्या.
  • आता साबुदाण्यामध्ये थंड पाणी घालून हाताने साबुदाणा हलका कुस्करून घ्या. त्यामुळे साबुदाण्याचे दाणे वेगळे होतात.
  • त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
  • तवा गरम झाल्यावर त्यात २ चमचे देशी तूप घालून जिऱ्याची फोडणी द्या.
  • आता कढईत बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून तळून त्यात उकडून चिरलेले बटाटे घाला.
  • बटाटे भाजल्यावर त्यात शेंगदाण्याचे कूट आणि साबुदाणा घालून साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित परतून घ्या.
  • अशा पद्धतीची साबुदाण्याची खिचडी तुम्ही कधीही करू शकता.