Leftover Chapati Samosa Recipe: तुम्ही कधी चपाती समोसा खाल्ला आहे का? कदाचित तुमच्यापैकी कित्येकांना हे नाव देखील ऐकली नसेल. पण तुम्हाला जर समोसा खायला आवडत असेल तर चपाती समोसा देखील नक्की आवडेल. हा समोसा देखील तितकाच चवदार आहे जितका पारंपारिक समोसा आहे.

प्रत्येक घरांमध्ये रात्रीची चपाती शिल्लक राहते आणि अनेकदा कोणीच ती खात नाही. मग आशावेळी चपाती टाकून देण्यापेक्षा तिच्या समोसा तयार करू शकता. चटपटीत आणि कुरकुरीत चपाती समोसा लहानांपासन मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि तो सहज तयार करता येतो. तुमच्याकडेही जर रात्री राहिलेल्या चपात्या सकाळी खायच्या असतील तर तुम्ही चपाती समोसा करु शकता. चपती समोर सकाळी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊ या रेसिपी

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

चपाती समोसा बनवण्यासाठी साहित्य


ब्रेड – ४
उकडलेले बटाटे – २-३
बेसन – ३ चमचे
हिरवी मिरची चिरलेली – २
लाल तिखट – १/२ टीस्पून
गरम मसाला – १/२ टीस्पून
काळे तीळ – १/२ टीस्पून
कोथिंबीर पाने – २-३ चमचे
तळण्यासाठी तेल
मीठ – चवीनुसार

चपाती समोसा रेसिपी


चपाती समोसा बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळून घ्या. यानंतर, बटाटे सोलून घ्या आणि बटाटे एका भांड्यात चांगले स्मॅश करा. यानंतर कढईत १-२ चमचे तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात काळे तीळ आणि हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर, स्मॅश केलेले बटाटे पॅनमध्ये ठेवा आणि चमच्याच्या मदतीने चांगले परतून घ्या. साधारण 1 मिनिट बटाटे परता.

आता बटाट्याच्या मिश्रणात गरम मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यावर हिरवी कोथिंबीर टाका. समोशामध्ये भरण्यासाठीचे मिश्रण तयार आहे. आता एका छोट्या भांड्यात बेसन घालून त्यात थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. यानंतर, चपच्या घ्या आणि चाकूच्या साहाय्याने मधूनमधून दोन तुकडे करा.
आता चपातीचा तुकडा घ्या आणि त्याला शंकूचा आकार द्या. यानंतर शंकूमध्ये बटाट्याचे तयार मिश्रण भरा आणि दाबून समोसे बनवा. चपातीच्या काठावर बेसनाचे पीठ लावून हाताने दाबून घ्या. सर्व समोसे अशाच प्रकारे तयार करा.

आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार चपाती समोसे टाकून तळून घ्या. समोसे तळताना आच मंद ठेवा. समोसे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. समोसे कुरकुरीत झाल्यावर ताटात काढा. सर्व समोसे त्याच प्रकारे तळून तयार करा. स्वादिष्ट चपाती समोसे तयार आहेत. सॉससह गरमा गरम चपाती समोसाचा आनंद घ्या.

Story img Loader